टाकळी हाजीत विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृती अभियान
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी हाजी
टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातून फेरी काढून मतदार जनजागृती मोहिम राबविली.२० नोव्हेंबर २०२४ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, याकरिता मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध भागात पथनाट्य तसेच रॅलीद्वारे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या उपक्रमास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मताधिकार बजावण्याचा संकल्प मतदार करीत आहेत.
टाकळी हाजी येथे विद्यार्थ्यांनी मतदान हा अधिकारच नाही तर कर्तव्य आहे,.. मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! अशा घोषणा दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पंचायत समिती शिरूर तसेच शिक्षण विभागाच्या वतीने विशेष मोहिम राबविली जात आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी चौका चौकात जावून ग्रामस्थांसोबत मतदानाचा हक्क बजावण्याची तसेच १०० टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. यावेळी शाळेचे केंद्र प्रमुख महादेव बाजारे , मुख्याध्यापिका आशा खोमणे, सहशिक्षक अर्जुन पांढरकर, मच्छिंद्र देवकर,मंगल गावडे,, प्राजक्ता मुळे आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक उपस्थित होते.