महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण : शिरूर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

घोडगंगा कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश पवार यांना विवस्त्र करून खंडणीची मागणी

0

शिरुर :
शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचे सुपुत्र व रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार (वय २६) यांचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी ( दि.९) दुपारी पावणे दोनच्या सुमारास मांडवगण (ता.शिरूर) येथे ही घटना घडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिरूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून अशोक पवार निवडणुक लढवत आहेत. वडिलांसाठी ऋषीराज पवार हे मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे प्रचार करीत होते. यावेळी तेथील भाऊ कोळपे व इतर दोन अनोळखी व्यक्ती यांनी काही मुले आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत असे म्हणुन दोन मोटार सायकल वरून ऋषिराज यांना घेवून जावुन एका बंगल्यामध्ये नेले. तेथे बेडरूम मध्ये डांबुन ठेवुन हाताने मारहाण करून हाताने गळा आवळुन जबरदस्तीने कपडे काढण्यास लावले. तेथे एका अनोळखी महीलेस बोलावुन घेवून तीचे सोबत जबरदस्तीने अश्लील हलचाली करण्यास लावुन त्याची शुटींग काढुन त्या आधारे व जीवे मारण्याची धमकी देवून १० कोटीची खंडणीची मागणी करून मला बेडरूम मध्ये जबरदस्तीने डाबुन ठेवले, असे ऋषिकेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गिरी हे पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.