बेट भागात जनावरांना लम्पीची लागण
बेट भागात जनावरांना लम्पीची लागण
टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या परिसरातील गावरान तसेच संकरित गाईंना
लम्पीची लागण झाली आहे.
टाकळी हाजी पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत बारा जनावरांना लम्पीची लागण झाली असून त्यातील सात जनावरे उपचारानंतर बरी झालेली आहेत. कवठे यमाई पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत पंचवीस जनावरांना लागण झाली असून वीस जनावरे बरे झाले आहेत.तर तीन जनावरे मात्र दगावली आहेत.
लम्पीची लस दिल्यामुळे उपचारादरम्यान जनावरे बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर उपचार करून घेतले तर हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो असे डॉक्टर प्रवीण कथले व दत्ता मुने यांनी सांगितले.
ग्रामपंचायत प्रशासनाने जेथे जेथे लम्पी ची जनावरे आढळून आले आहेत त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण केले आहे. शेतकऱ्यांनी जनावरे खरेदी करताना तसेच लक्षणे दिसताच उपचार करून काळजी घ्यावी असे आवाहन टाकळी हाजीच्या सरपंच अरूणा घोडे यांनी केले आहे.