वडझिरे येथे रंगला माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

विद्यालयातील माजी विद्यार्थी तब्बल ३० वर्षांनी आले एकत्र

0

 

पारनेर :

जनसेवा विद्यालयातील इयत्ता दहावी सन १९९४ सालातील वर्ग मित्र-मैत्रिणींचा स्नेहमेळावा कृष्णलिला मंगल कार्यालय वडझिरे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील मस्ती ,एकत्रितपणे केलेला अभ्यास ,शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक ,शाळेतील क्रीडा स्पर्धा ,विविध बाह्य परीक्षा अशा विविध विषयांवर गप्पागोष्टी करत माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

गणेशा , सरस्वती आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्नेहमेळाव्याची सुरुवात करण्यात आली . शोभा लंके ,विद्या दिघे, प्रफुल्ला मोरे यांनी स्वागतगीत गायन करत मान्यवर गुरुजन व माजी विद्यार्थ्यांचे बहारदार स्वागत केले . ज्ञानेश्वर कवडे यांनी प्रास्ताविकात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना ग्रुपवर संघटित करून स्नेहमेळाव्या विषयी चर्चा घडवत तब्बल ३० वर्षांनंतर स्नेहमेळावा आयोजित केल्याचे सांगितले. बाळासाहेब बोरकर यांनी वर्ष १९९४ नंतर जे शिक्षक -विद्यार्थी काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांची माहिती दिली व त्यांना सर्वांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली .

या स्नेह मेळाव्यासाठी गुरुजनांना निमंत्रित करण्यात आले होते . बळवंतराव झावरे ,भाऊसाहेब कांजवणे , रामदास कवडे , वसंत पवार बापूसाहेब हांडे , भाऊसाहेब रोहोकले , गोविंद जगदाळे , श्रीम सुमन आहेर , सौ.शारदा जगदाळे आदी शिक्षक उपस्थित होते . उपस्थित सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह शाल व पुष्प गुच्छ देवून विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

अनेक वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले . शाळेविषयी जुन्या आठवणींना उजाळा देत डॉ संतोष पोटे , रोहिणी मेहेर , राजेंद्र जगदाळे , मुकेश राऊत , विजय कुमार राऊत , सुनिल नवले ,संतोष खोसे यांनी सुंदर मनोगत व्यक्त केले . तसेच सर्वांनी आपली स्व-ओळख सांगितली . स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानचिन्ह देवून गुरुजनांच्या हस्ते गौरविण्यात आले .
डॉ.संतोष पोटे यांच्या संकल्पनेतून नशीबवान विद्यार्थी व शिक्षक लकी ड्रॉ च्या आयोजनाने कार्यक्रमाची रंगत वाढविली.संतोष सपकाळ , मंगल खणकर ,रोहिणी मेहेर हे नशीबवान विद्यार्थी लकी ड्रॉ विजेते ठरले.
या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत आपण प्रत्येकाने एक वृक्ष तरी लावावा व त्याचे संवर्धन करावे असे वृक्ष मित्र रामदास कवडे यांनी सांगितले . आपण ज्या शाळेत शिक्षण घेतले व ज्या गुरुजनांनी आपल्याला शिक्षित केले त्यांच्या बद्दल भविष्यकाळात कृतज्ञता जपण्याचे आवाहन भाऊसाहेब कांजवणे यांनी केले .एस एस सी बॅच १९९४ ने अतिशय सुंदर व नेटके नियोजन करत स्नेह मेळावा आयोजित केला गुरुजन व विद्यार्थ्यांची तीस वर्षानंतर भेट घडवून आणल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंतराव झावरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी विद्यार्थी किर्ती श्रीमंदीलकर, काळूराम लंके , मल्हारी खोसे , अनिता ढवळे, शिवाजी राऊत , संतोष थोरात , संतोष मोरे ,सुरेखा कोरडे , बाळासाहेब दिघे , शिवाजी औटी , शांता लंके , शाकुबाई जाधव , पंढरीनाथ मोरे , वंदना जाधव , बाबाजी करकंडे , रविकांत घोडके , कैलास नवले , निर्मला खोसे , गुलाब चौधरी , रंजना खोसे , निवृत्ती निघूट , संपत गंधाक्ते , सुरेश बोरुडे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा लंके ,विद्या दिघे व प्रफुल्ला मोरे यांनी केले तर ईश्वर थोरात यांनी सर्वांचे आभार मानले .

ज्ञानेश्वर कवडे,संतोष दिघे ,प्रविण निघूट ,कैलास मोरे,संतोष सपकाळ , विजय जगदाळे , भरत सोनवळे ,रमेश खोसे यांनी या स्नेहमेळाव्याचे नेटके व सुंदर आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले .

Leave A Reply

Your email address will not be published.