श्री मुलिकादेवी महाविद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम …

स्वच्छता शपथ घेऊन सुरुवात

0

निघोज | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज आणि खेल मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ हा पंधरवडा साजरा केला जात आहे. या मोहिमेचे ब्रीदवाक्य स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे असून या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता हा गुण विकसित करण्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ दिली. याबरोबरच विद्यार्थ्यांनी आपले घर, शाळा, महाविद्यालय, गाव, तालुका यासह आपले ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांची स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे हा गुण अंगी रुजवण्यासाठी या अभियानाचे आयोजन केले आहे.

आजचा युवक हा उद्याचा नागरिक आहे तसेच महाविद्यालयीन युवक हे आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच आधुनिक विचार शैलीचेही असल्याने त्यांच्यामध्ये स्वच्छता हा संस्कार रुजविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या संस्कारातून आपले कुटुंब महाविद्यालय व देश यांची स्वच्छता रूपाने सेवा या विद्यार्थ्याकडून होणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शपथेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी प्रत्येक दिवशी दोन तास आपले स्वच्छतेसाठी दिले पाहिजेत असा संदेश या शपथेमध्ये देण्यात आला.

या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर एरंडे यांनी स्वयंसेवकांना शपथ दिली . तसेच या कार्यक्रमा वेळी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. स्वाती मोरे, सह कार्यक्रमाधिकारी डॉ. गोरक्ष घोलप , प्रा. वृषाली जगदाळे, प्रा. पुनम गंधाक्ते, प्रा. नम्रता थोरात, प्रा. अशोक कवडे , प्रा. सचिन निघुट, प्रा. अक्षय अडसूळ, डॉ. प्रवीण जाधव, प्रा. आनंद पाटेकर, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा. अश्विनी सुपेकर, प्रा . स्वाती पवार, प्रा. नूतन गायकवाड, प्रा. संगीता मांडगे, प्रा. नीलिमा घुले, प्रा. हर्षदा पंडित, प्रा. सुनंदा गाडीलकर, प्रा. अमृता दौंडकर प्रा. अपेक्षा लामखडे, प्रा. सुरेश गाडीलकर, प्रा. खामकर, प्रा. सरडे यांच्यासह नवनाथ घोगरे, संदीप लंके, अक्षय घेमुड, किशोर बाबर आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत आपल्या स्वभावात कोणकोणते गुण रुजवले पाहिजे याविषयीचे महत्व विषद केले. पुढे बोलताना महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारतामध्ये 75 वर्षानंतरही आपल्याला युवकांमध्ये स्वच्छता संस्कार करण्याची आवश्यकता आहे तसेच महात्मा गांधींनी जे स्वच्छतेचे संदेश दिले ते आपण पुन्हा एकदा अंगीकारण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.