कवठे येमाईत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चास फाटा

0

टाकळी हाजी | 

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्चास फाटा देत कवठे येमाईचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा बापूसाहेब गावडे सोसायटीचे संचालक भाऊसाहेब घोडे यांनी कवठे येमाई (ता.शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी वह्या, पेन शालेय साहित्य भेट दिले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्य सुभाष उघडे, सनी रेणके, निलेश पोकळे, रामदास पोकळे, आनंदा रोहिले, नामदेव येडे, संतोष चिद्दरवार, हेमंत कर, वैभव दळवी, अनिकेत रेणके, नवनाथ सांडभोर , उपाध्यक्ष डॉ आरती उचाळे, अर्चना देवकर आदी मान्यवर ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.

दरम्यान शाळेत सकाळी योग दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य,मजबूत शारीरिक क्षमता राखण्यासाठी व्यायामाबरोबर योग धारणा किती महत्वाची असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांसह माहिती व योगाचे महत्व सांगण्यात आल्याचे मुख्याध्यापक सखाराम फंड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.