१९ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा…

सोशल मीडियातील "आमची शाळा" ग्रुपचा उपक्रम

0

विजय थोरात |टाकळी हाजी 

 

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन २००५ – २००६ बॅचच्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.”आमची शाळा” या सोशल मीडियावरील ग्रुपच्या वतीने हे नियोजन करण्यात आले.

 

तब्बल १९ वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र जमले होते.सर्व माजी विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत सनईच्या सुरात , ताशाच्या वाद्यावर शाळेच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.सर्वांनी फेटे परिधान केल्याने सर्वत्र एक वेगळेच चित्र पहावयास मिळत होते. विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गावडे व शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली.विद्यालयाचे दिवंगत प्राचार्य सोनभाऊ गावडे,शिक्षक अरुण गडकरी,खंडू बोखारे,माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर उचाळे यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली.माजी विद्यार्थ्यांनी मानपत्र,फेटा,शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांचा गौरव केला.तसेच माजी विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयास पर्यावरण दिनानिमित्त रोपवाटीका भेट देण्यात आल्या.यावेळी ज्ञानदेव गावडे,महेंद्र गायकवाड,गोपीनाथ शेटे,नवनाथ राऊत,राजेंद्र गोसावी,भाऊसाहेब तापकीर,दत्तात्रय शिंदे,मुळशी तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्राचार्य आर.बी.गावडे यांनी सांगितले की,माजी विद्यार्थी स्नेहमेळावा सध्याच्या आधुनिक काळात गरजेचा आहे.१९ वर्षानंतर एकत्रित भेटल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते, हिच मैत्री आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जपत रहा,प्रत्येकाच्या सुख दुःखात एकमेकांना भेटत रहा,पूर्वीची शाळा आताची शाळा यामध्ये खूप अमुलाग्र बदल झालेला आहे,तुमच्या सारख्या गुणवान विद्यार्थ्यांमुळे तालुक्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शाळेला मिळाला आहे, मित्रामुळे आयुष्याला नवसंजीवनी मिळण्याचे काम निश्चितच होत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्यात देखील सहभागी व्हावे असेही गावडे यांनी सांगितले. यावेळी शिक्षक महेंद्र गायकवाड,ज्ञानदेव गावडे,नवनाथ राऊत यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

 

यावेळी शुभांगी साळवे,पंढरीनाथ उचाळे, सुवर्णा देवकर, राहुल चोरे, संदीप चोरे, मंगल सराफ, गणेश गावडे, अनिल रसाळ, प्रदीप किठे, गोरक्ष घोडे, राकेश साळवे, छाया सोदक, प्रशांत शितोळे, रुपाली कोल्हे, मयूर कांदळकर, दत्तात्रय गावडे, सुनिता गावडे, सारिका सोदक, प्रशांत शिंदे, संदीप घोडे, राजश्री औटी, आशा औटी, दादाभाऊ घोडे, सचिन सदाफुले, गुलाब कांदळकर, वंदना पवार, मनिषा रसाळ, रुपाली आटोळे, साधना रसाळ, अंकुश साबळे, प्रियंका होणे, रुपाली गाडगे, रुपाली कांदळकर, अजित चोरे, अनिल जाधव, हैदरअली हवालदार या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

या बॅचचे माजी विद्यार्थी हे पोलिस उपनिरीक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, बँक, पोलिस, वकील, हॉटेल, कपडे वस्त्रोद्योग, पत्रकार, मेडिकल, कंपनीत उच्च अधिकारी, उत्तम गृहिणी, स्वव्यवसाय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पारंगत आहेत. तर काहीजण शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे.

 

गाण्याच्या ठेक्यावर संगीत खुर्ची,फुगे फोडणे,कपाळावर बिस्कीट ठेऊन हात न लावता खाऊन टाकणे इत्यादी स्पर्धेत सर्वांनी सहभाग घेतला, कार्यक्रमाचे आयोजन पोलिस उपनिरीक्षक विद्या साळवे, विजय थोरात, अरुण सोदक, प्रशांत रसाळ, गणेश टाव्हरे यांनी केले. प्रास्ताविक दत्तात्रय कांदळकर , सुत्रसंचालन लहू साबळे यांनी तर आभार रघुनाथ कांदळकर यांनी मानले.

२०१६ पासून सोशल मीडियावर “आमची शाळा” नावाने ग्रुपची स्थापना करण्यात आली,खूप वेळा सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला परंतु अनेक वेळा काहीना काही अडचणीमुळे व्यत्यय येत होता परंतु सर्वांच्या सहकार्याने १९ वर्षानंतर आम्ही सर्वजण एकत्रित भेटलो.जुन्या मित्र मैत्रिणींना भेटल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे. इथून पुढे सातत्याने स्नेहमेळावा आयोजित करण्यात येईल.
…. सौ.विद्या प्रताप साळवे ,आयोजक – माजी विद्यार्थिनी/( पोलिस उपनिरीक्षक – छत्रपती संभाजीनगर)

Leave A Reply

Your email address will not be published.