तो ठरतोय भगीरथ ! तो सांगतोय अण् धरणीला पाझर फुटतोय..
कातळातील गुप्त गंगा तो अणतोय दुबळ्याच्या दारी
निमोणे : बापू जाधव
कुणी त्याला योगायोग म्हणा , कुणी श्रध्दा पण तो बोलतो आणि अगदी तसेच घडते , दोन खोल्यांच घर असेल तर भिंती पलीकडचं पहायचं असेल तर दुसऱ्या खोलीत जावे लागते ..पण हा गडी एका जागेवर उभा राहिला की बघ्यांचा शंभर टक्के विश्वास बसतो येथे नक्की पाणी आहे !
आजच्या घडीला सगळीकडे पाण्याचे स्ञोत अटलेत नदी- नाले , विहिरी – बारवा अक्षरशः कोरड्या पडल्या आहेत ..जमिनीला भोक पाडून पाणी काढण्यासाठी सगळीकडे स्पर्धा लागली आहे ..तथाकथित पान्हाडे ..मला तर पाणी दिसते पण तुझ्या नशिबात नाही असे सांगून शेतकऱ्यांना हजारो रुपायांना चुना लावत असल्याचे जागोजाग पहावयास मिळत आहे !
असे दुदैवी चिञ असताना निमोणे नजिक पिंपळाचीवाडी येथील परसराम गव्हाणे व बाळासाहेब गव्हाणे हे दोन बंधू अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरले आहेत , मांढरदेवी काळूबाईचे निस्सीम भक्त असणारे परसराम गव्हाणे यांची बाळू मामांवरती अफाट भक्ती आहे ..देव हा भक्तीचा भुकेला असतो ..देव हा कधीच प्रत्यक्ष येत नाही तर निष्ठावंत भक्ताच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या जीवाला मदतीचा हात देत असतो,याचा प्रत्यय निमोणे परिसरातील नागरिक सध्या घेत आहेत.
पाण्यासाठी कासावीस झालेल्या बळीराजाला परसराम गव्हाणे यांनी जागा दाखवली आणि पाणी लागले नाही असे कधीच होत नाही..जिथे चिमणी कोकली तरी पाण्याचा थेंब नाही अशा ओसाड रानात पाण्याचे लोट वाहण्याची ताकद परसराम गव्हाणे यांच्या श्रध्देत दिसून येते..शेती , पशुसेवा करणारे परसराम गव्हाणे हे कधीच कोणत्या प्रसिध्दीच्या फंदात पडत नाहीत माञ मनापासून केलेली सेवा परमेश्वराला ही मान्य असते..अन्न- पाण्यावाचून अडचणीत आलेल्या जीवाला आपल्या श्रध्देच्या आणि एकाग्रतेच्या जोरावर कातळातील गुप्त गंगा धरणीवर खेळवणाऱ्या परसराम गव्हाणे यांचा या परिसरात सद्या बोलबाला झाला आहे .
कुणी याला श्रध्दा समजा ..कुणी अंधश्रध्दा पण परसराम देवीच्या नावाने जागा दाखवतोय आणि बोअरवेलच्या रुपाने कातळातील गुप्त गंगा धरणीवर अवतीर्ण होते,हे तुम्ही कसे नाकारणार ? ..उजाड माळावर .पाण्याचे खळखाळणारे लोट पाहिले की वाटते देव भक्तीचा भुकेला आहे ..भोळाभाबडा जीव मनापासून जेव्हा त्याची आराधना करतो तेव्हा तो उभा राहतो हेच या निमित्ताने अनुभवयास मिळाले हे माञ नक्की !