टाकळी हाजी येथे भिंत छेदून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

0

टाकळी हाजी |टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी रामदास कारभारी घोडे यांच्या पोल्ट्री मध्ये शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. मंगळवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या आहेत .

घोडे यांच्या घराजवळच पोल्ट्रीचे शेड बांधलेले आहे. त्यामध्ये कोंबड्या नसल्याने त्यांनी तिथे शेळ्या बांधलेल्या होत्या. पोल्ट्री शेडसाठी खालच्या बाजूस दोन फुटांचे विटांचे बांधकाम केले असून त्यावर तारेची जाळी लावलेली आहे. आत शिकार दिसल्याने बिबट्याने विटांचे बांधकाम उकरून आत प्रवेश केला व शेळ्यांवर हल्ला केला. या दरम्यान तिथेच झोपलेले घोडे यांचे कामगारास जाग आली व त्यांनी आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे.

वन विभागाने पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच हल्ले झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी.

– दामूशेठ घोडे आदर्श सरपंच टाकळी हाजी

Leave A Reply

Your email address will not be published.