कवठे येमाई येथे शेळ्यांची चोरी

0

टाकळी हाजी | कवठे येमाई (ता. शिरूर) येथे शुक्रवारी दि. ( 2 ) मध्यरात्रीच्या सुमारास तीन शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाली आहेत.

अष्टविनायक महामार्ग लगत इचकेवाडी येथे साईनाथ फक्कड इचके राहत आहेत. त्यांच्या घराशेजारीच शेळ्यांचा गोठा आहे. रात्री दोनच्या सुमारास शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने साईनाथ इचके यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र घराच्या बाहेरील दोन्ही दरवाजांच्या कड्या चोरट्यांनी लावून घेतल्या होत्या. यामुळे इतके यांनी शेजाऱ्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली असता शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी तिथे एक उभी असलेली वॅगन आर गाडी घाईघाईने निघून गेल्याचे त्यांनी पाहिले.

बाहेर आल्यानंतर इचके यांना गोठ्यातील सर्व शेळ्या अंगणामध्ये मोकळ्या असल्याचे निदर्शनास येताच त्यांच्याकडील 27 पैकी तीन शेळ्या कमी असल्याने त्यांना शेळ्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या गाडीतून शेळ्या चोरून नेल्या असाव्यात असा अंदाज इचके यांनी व्यक्त केला. त्यांनी गाडीचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र ती गाडी भरधाव वेगाने निघून गेली व वेळ जास्त झाला त्यामुळे गाडी सापडू शकली नाही.

अशाप्रकारे रात्रीच्या वेळी अष्टविनायक महामार्गावर मलठण – कवठे येमाई – पारगाव या परिसरात शेळ्या चोरीच्या घटना या पूर्वीही घडल्या असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.