सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचा कार्यक्रम उत्साहात
सचिव विराज वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
टाकळी हाजी | सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर उत्तम संस्काराची शिदोरी दिली असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ते सदैव तुमच्या सोबत असतील. असे आश्वासन देत संदिप पाटील वराळ जनसेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष सचिन वराळ पाटील यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
निघोज (ता.पारनेर) येथील सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील फार्मसी कॉलेज मध्ये बुधवारी ( दि. 13) डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि संस्थेचे सचिव विराज वराळ पाटील यांचा वाढदिवस समारंभ जेष्ठ पत्रकार दत्ताजी उनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.
संस्थेचे सचिव विराज वराळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कॉलेज मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोमवारी व मंगळवारी दोन दिवस ( दि.11व 12) क्रिकेट, कबड्डी, पोस्टर प्रेझेंटेशन, रांगोळी, क्विझ, स्टूडेंट ऑफ इयर आदी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धा
क्रिकेट स्पर्धेत पदवी आणि डिप्लोमा अशी लढत झाली. यामध्ये पदवी च्या विद्यार्थ्यांनी 11 रणांनी विजयश्री खेचून घेतली. उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार संदिप इधाटे सर व उत्कृष्ट फलंदाज पुरस्कार आदित्य फुंदे यांनी पटकविला.
कबड्डी स्पर्धा
पदवी आणि डिप्लोमाच्या कबड्डी (मुले) स्पर्धेत डिप्लोमाच्या हर्षवर्धन वाखारे यांच्या संघाने तर कबड्डी (मुली) स्पर्धेत पदवीच्या विशाखा खराडे यांच्या संघाने विजय मिळवला.
पोस्टर प्रेझेंटेशन
प्रथम क्रमांक: प्रीती मावळे (एस वाय डी फार्म)
उपविजेते : रोहिणी सुपेकर व गायत्री साबळे (एस वाय बी फ़ार्म)
रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक : पायल घोडे आणि श्रुती चक्रे ( एस वाय बी फार्म)
उपविजेते : समृद्धी लाळगे आणि आकांक्षा बोचरे (एफ वाय डी फार्म)
क्वीज कॉम्पिटिशन
विजेते : एस वाय डी फार्म… प्रतीक्षा हारे, विशाखा जाधव, प्रीती मावळे नम्रता नरवडे,प्रतीक फुलारे, विनोद उचाळे
सोलो डान्स
विजेते : सिद्धी ठाकूर (एस वाय बी फार्म,) , पायल निचित (एस वाय डी फार्म )
ग्रुप डान्स
विजेते : एफ वाय बी फार्म मुले
उपविजेते : एफ वाय बी फार्म मुली
स्टुडन्ट ऑफ द इयर एस वाय डी फार्म
प्रीती मावळे , सुधीर गरजे ( एस वाय डी फार्म)
स्टुडन्ट ऑफ द इयर पदवी आणि डिग्री
पदवी : प्रतीक्षा बेलोटे,
डिप्लोमा : दिग्विजय साठे
सहभागी स्पर्धकांना व विजयी संघास मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. यावेळी सामजिक, शैक्षणिक , धार्मिक , कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा तसेच पंचक्रोशीतील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कठोर परिश्रम केल्यास यश आपल्यासमोर उभे राहते. चिकाटी सोडू नका.
— वैद्य सर , प्राचार्यविद्यार्थ्यांनी शालेय जीवनात आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने जिद्द, अथक मेहनत तसेच खेळ, फॅशन , औषध निर्माण शास्त्र यामध्ये आपले करिअर बनवावे.
— डॉक्टर शिफा शिकलगार, उप प्राचार्य