शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ
मलठण | मलठण ( ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ पार पडला.
यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या आठवडे बाजार उपक्रमातून बाजार खरेदी केला.
या वेळी शाळेच्या शिक्षिका पवार मॅडम, जाधव मॅडम , अंगणवाडी सेविका उषा शिंदे, सोसायटी संचालक गंगाराम शिंदे, ग्रामपंचायत सदस्य किरण शिंदे, हर्षद शिंदे तसेच महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हळदी कुंकू समारंभ निमित्त आलेल्या महिलांना आकर्षक भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.