टाकळी हाजी येथे विकासकामांचे भूमिपूजन
टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर मधून भिल्लवस्ती येथे सभागृह बांधणे (पाच लाख), आणि जिल्हा परिषद निधी अंतर्गत भिल्लवस्ती येथे अंतर्गत रस्ते तयार करणे (दहा लाख) या कामांचे भूमिपूजन शनिवारी ( दि.9) सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आदर्श सरपंच दामूशेठ घोडे,सोसायटीचे अध्यक्ष बन्सी घोडे, पारभाऊ गावडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, बाबाजी साबळे, भरत खामकर, विलास साबळे, अर्जुन खामकर, दत्ता दिवेकर, शंकर थोरात, बाळासाहेब जाधव, पंढरी उचाळे, सावकार घोडे, सतीश घोडे, अंकुश घोडे, दगडू हवालदार, बन्सी खामकर, गणेश कसबे, सोनबा खाडे,राहूल रसाळ, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे, संभाजी मदगे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.