टाकळी हाजी येथे एस. पी. नगर प्राथमिक शाळा भौतिक सुविधा व रंगकाम कामाचा शुभारंभ ….
आय टी सी कंपनीकडून सुमारे 7 लाख 35 हजार रूपयांचे भरीव योगदान
टाकळी हाजी | टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या एस पी नगर शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आय टी सी कंपनीकडून सुमारे 7 लाख 35 रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंगळवारी ( दि .30 जानेवारी) शिरुर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांच्या शुभहस्ते कऱण्यात आला.
संरक्षक भिंत, लोखंडी गेट, स्वच्छतागृहाचे दुरुस्ती, संपूर्ण शाळेला किचन सह रंगकाम यासाठी आय टी सी कंपनीच्या माध्यमातून हे काम होणार असून यासाठी लोक सहभाग म्हणून दहा टक्के रक्कम भरावी लागते. यासाठी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी रुपये 10 हजार, ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ 5 हजार, मळगंगा ढोल ताशा मंडळ 5 हजार,मुख्याध्यापक बाबासाहेब गव्हाणे 5 हजार आणि सहशिक्षक बाळासाहेब खामकर यांनी 5 हजार रुपये अशी रक्कम रोख स्वरूपात यावेळी जमा करण्यात आली.
यावेळी शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास आबा कोहोकडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, टाकळी हाजी सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे ,आय टी सी कंपनीचे अधिकारी आशिष उहाने , मोरे , केंद्र प्रमुख महादेव बाजारे, ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, पारुबाई माळी, बाळासाहेब जाधव, मोहन गावडे, विजय धुळे, दादाभाऊ बरडे , सर्जू माळी , आणि एस पी नगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल पांढरकर , आभार बाळासाहेब खामकर यांनी केले.
मान्यवरांचे मळगंगा ढोल ताशा मंडळाने ढोल ताशाच्या गजरात व फटाके वाजवून स्वागत केले. या शाळेतील बहुतांश विद्यार्थी विशेषतः आदिवासी प्रवर्गातील असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या स्वागताने मान्यवर भारावून गेले. आमदार अशोकबापू पवार यांनी माजी सरपंच दामूआण्णा घोडे यांना येथील विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाविषयी जागृत करून सहयोग केल्याबद्दल विशेष कौतुक केले.