शिरुर- हवेलीच्या रणांगणावर… दादांचे रवि काळेंना बळ!
नियोजन समितीवर वर्णी लागल्याने तालुक्याची राजकीय समिकरणे बदलणार
शिरुर : | राजकारण हा अनिश्चितेचा खेळ आहे, भविष्याच्या पोटात काय दडले हे कधीच कोणाला वाचता येत नाही. असे असले तरी भविष्याचा अचुक वेध घेऊन जो वाटचाल करतो तोच राजकारणाच्या या धामधुमीत टिकतो…कोणाच्या मनी-ध्यानी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली. साहेब की दादा …. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या विवंचनेत सगळा तालुका असताना रवि काळे यांनी माञ धाडसाने पाऊले टाकत अजितदादांचा पर्याय निवडला. हा निर्णय घेणे तसे रवि काळे यांच्यासाठी सोपे नव्हते, रवि काळे हे मागील तीस वर्षापासून शिरुर तालुक्याच्या सार्वजनिक जीवनात एक संघर्षशिल व्यक्तीमत्व म्हणून वावरत असले तरी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही शेतकरी अशीच राहिली आहे .
तालुक्याच्या समाजकारणात, राजकारणात फर्डा वक्ता व अभ्यासू नेता अशी प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू, म्हणजे जिथे काम करतील तिथे अतिशय प्रामाणिक पणे काम करणारा , कोणत्याही अमिषाला बळी न पडणारा हा कार्यकर्ता शब्दाशी पक्का आहे. आणि याच इमानदारीच्या भांडवलावर दस्तुरखुद आमदार अशोक पवार यांची साथ नसतानाही रवि काळे यांनी तालुका पिंजून काढून दादा गटाचे बळ लक्षणी रित्या वाढवले .
शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, जि.प माजी सदस्य राजेंन्द्र जगदाळे , माजी सभापती मोनिका हरगुडे आदी मातब्बरांच्या साथीने शिरुर तालुक्याच्या सत्तासमिकरणात दादा गटाची ताकद समोरच्याच्या नजरेत भरेल इतकी वाढवली. रवि काळे सारखा उमदा कार्यकर्ता पायाला भिंगरी लावून संघटन वाढवतो याची दखल दस्तुरखुद अजितदादांनी घेऊन काळे यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी वर्णी लावली आहे ,
आजच्या घडीला गावोगावची शिष्टमंडळे विविध अडीअडचणी, समस्या घेऊन काळे यांच्या भेटीला येत असल्याचे पाहिला मिळत आहे , नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर रवि काळे यांनी अजितदादांच्या कृपेने करोडो रुपयांची विकास कामे मंजूर करुन घेतली असून थोड्याच दिवसात या कामांना मुहूर्त स्वरुप मिळणार आहे.. लोकांच्यात रमणारा हा लोकनेता भविष्यात शिरुर – हवेलीच्या विकासाचा शिल्पकार होवो, याच भावनेने त्यांचे समर्थक कार्यप्रवण झाल्याने …शिरुर – हवेलीच्या सत्ताकारणात रवि काळे नावाच्या लोकनेत्याला भविष्यात चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.