शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते

उपाध्यक्षपदी अश्विनी अमोल वाव्हळ यांची निवड

0

मलठण | मलठण ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते व उपाध्यक्षपदी अश्विनी अमोल वाव्हळ यांची निवड झाली.

विदयार्थी व शाळेशी निगडित समस्या सोडवून शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष सागर आप्पा दंडवते यांनी सांगितले.

नूतन पदाधिकारी यांचे मलठण सोसायटीचे माजी चेअरमन नाना फुलसुंदर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश दंडवते , दत्ता गडदरे यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.