श्रीदत्त विद्यालयात माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन
पिंपरखेड | पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयात रविवार (दि.१४) माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी श्रीदत्त विद्यालयासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड आणि काठापूर खुर्द येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
गेली अनेक वर्षे माजी विद्यार्थी संस्था अशाप्रकारे या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत असून परीक्षेस बसलेल्या तीन गटांतून प्रत्येकी पाच क्रमांक काढण्यात येतात. आणि चांगले गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येते. भविष्यकाळात विद्यार्थ्यांना लोकसेवा आणि राज्यसेवा परीक्षेची आवड निर्माण व्हावी तसेच स्पर्धा परीक्षांचे ज्ञान अवगत व्हावे तसेच स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना प्रश्नांचे स्वरूप , मुलाखती आदि बाबींचे अवलोकन व्हावे यासाठी माजी विद्यार्थी संस्था अशा प्रकारचे उपक्रम राबवत असते. तर विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील अधिकारी, उद्योजक आदींच्या व्याख्यानांचे देखील आयोजन करण्यात येत असते. अशी माहिती माजी विदयार्थी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी दिली.
या परीक्षेवेळी माजी विद्यार्थी संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर शेळके, सचिव प्रफुल्ल बोंबे, माजी सचिव आबाजी पोखरकर, वरिष्ठ लिपिक कैलास बोंबे, माजी उपसरपंच दिलीप बोंबे , प्राध्यापक रमेश गावशेते, देवराम ढोमे, संजय आल्हाट, सचिन बराटे , नारायण पाबळे, नितीन कोकाटे, विनोद बोऱ्हाडे, शरद बोंबे, राजेंद्र बोंबे, संतोष गायकवाड, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर ढोमे, नवनाथ बारवेकर, विजय बोंबे, दत्तात्रय वरे, रुपाली ठुबे, संदिप गावडे, किशोर बोंबे, लक्ष्मण थोरात,गणेश खैरे,प्रवीण बोंबे, रुपेश गावडे,अक्षय पोखरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.