राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवडी जाहीर
टाकळी हाजी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर – आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यामध्ये मतदार संघातील शिरूर मधील ४२ गावांतील कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली.
शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष पदी बन्सीशेठ घोडे
टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील माजी सरपंच आणि वि.का. सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन बन्सीशेठ घोडे यांची शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे. बैलगाडा शर्यती मुळे त्यांचे पुणे – नगर जिल्ह्यात मोठे नाव आहे तसेच धार्मिक,सामाजिक ,राजकीय , सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे.
शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ ओबीसी सेल अध्यक्ष पदी नाना फुलसुंदर
मलठण (ता. शिरूर ) येथील वि.का.सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन , माजी सैनिक नाना फुलसुंदर यांची शिरुर-आंबेगाव विधानसभा ओबीसी सेल अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार आणि शिरूर चे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या पत्नी शशिकला फुलसुंदर या मलठण गावच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या म्हणून कार्यरत आहेत.
शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ युवक कार्याध्यक्ष पदी परशुराम डांगे
शिरूर तालुक्यातील युवा कार्यकर्त्यांशी जवळीक आणि दांडगा जनसंपर्क असलेले सोनेसांगवी (ता शिरूर) येथील युवा नेते परशुराम डांगे यांची शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ युवक कार्याध्यक्ष पदी निवड झाली आहे.
शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष पदी उत्तमराव व्यवहारे
निमगाव भोगी ता. शिरूर येथील सामाजिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अग्रभागी असलेले उत्तमराव व्यवहारे यांची शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
त्याचबरोबर गोरखनाना ढोकले यांची शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष , तसेच शहाजीराव डफळ यांची पुणे जिल्हा(ग्रामीण) सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.
या सर्व मान्यवरांचे टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे, मलठण चे सामजिक कार्यकर्ते सागर दंडवते, मंगेश दंडवते यांनी अभिनंदन केले.