राज्य उत्पादन शुल्क विभागाची जोरदार वसुली
टाकळी हाजी I शिरूर तालुक्यासह बेट भागात हॉटेल, ढाब्यावर अवैध दारु विक्री करणाऱ्यांकडून राज्य उत्पादन शुल्क विभाग लाखो रुपयांची जोरदार वसुली करत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधिकारी यांचा एक वसुली पंटर जयदास दाते हा शिरूर सह खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील हॉटेल, ढाबे, ताडी विक्री केंद्र ,गावठी दारु विक्रेते या ठिकाणाहून तब्बल दहा ते बारा लाखांची वसुली करत असल्याची माहिती एका हॉटेल व्यावसायिकाने दिली असून या वसुलीची चर्चा तालुकाभर होत आहे. शिरूरच्या बेट भागात अवैध दारूचा महापूर वाहत असला तरी राज्य उत्पादन शुल्क मात्र वसुलीत गुंग आहे ,अशी परिस्थिती पाहावयास मिळत आहे. या वसुली बहाद्दरावर व अधिकारी यांच्यावर वरिष्ठ काय कारवाई करणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
सर
आमच्या आंबेगाव तालुक्यात शिणोली गावात अवैध रित्या दारू विक्री चालू आहे सादर धंदा हा चांगल्या लोक वस्ती मदे केला जात आहे आणि त्यामुळे तेथील नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्धांना दारू पिणाऱ्या लोकांकडून धोका संभवतो तसेच तिथे वारंवार भांडणे होत असतात गेले किती दिवस हा अवैध दारू धंदा चालू आहे यावरती आळा बसून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती सदर धंदा हा शिनोली गावांमध्ये दत्त मंदिर रोड समोर चालू आहे ,, आपल्याकडून न्याय मिळण्याची खूप अपेक्षा आहे सर कळावे आपला विश्वासू