शिवनगर शाळेत आरोग्य शिबीर
टाकळी हाजी l शिवनगर ( ता.शिरूर) जिल्हा परिषद शाळेमध्ये जीवन मेडिकल ट्रस्ट शिरूर चे अध्यक्ष डॉ.हिरामण चोरे यांचे आजार व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर व्याख्यान आणि विद्यार्थी व शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रथमोपचाराचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल अशा अतिशय सोप्या पध्दतीने डॉक्टरांनी समजावून दिले.
आणीबाणीच्यावेळी किंवा पेशंट बेशुद्धावस्थेत असताना प्रथमोपचार करताना डीआरएस आणि एबीसीडी या मुल्यांकनाचे महत्व प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले. अनेक आजार आणि साथींविषयी माहिती देताना प्रतिबंधात्मक उपाय विद्यार्थ्यांकडून वदवून घेतले.
आरोग्य तपासणीत दोषी आढळलेल्यांना औषधोपचार करण्यात आले. काहींना टॉनिक देण्यात आले. चौरस आहाराचे महत्व पटवून देण्यात आले.
शिवनगर शाळेसाठी पाच गुंठे जागा डॉक्टरांनी दिली असुन अनेक भौतिक सुविधा निर्माण करताना भरीव मदत केल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब घोडे यांनी सांगितले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक राजेंद्र नरसाळे आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.