जांबूत येथे दुकानाचे शटर उचकटून चोरी

0

 

पिंपरखेड वार्ताहर, दि. १३

 

-जांबूत (ता.शिरूर) येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक विजय ज्ञानदेव पळसकर यांचे दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी चोरी करत दुकानातील साहित्य व मशिनरी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये पळसकर यांचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पो.कॉ. दिपक पवार , विशाल पालवे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

याबाबत विजय पळसकर यांनी सांगितले कि,रात्री साडेदहाचे सुमारास आम्ही दुकान बंद करून घरी झोपण्यासाठी गेलो. यावेळी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस भरतीचे सरावासाठी आलेल्या मित्राने दुकानाजवळ सायकल लावण्यासाठी गेले असता दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने चोरीची बाब आम्हास समजली. यावेळी झालेल्या या चोरीमध्ये दुकानातील दोन ड्रील मशीन, ग्रॅंडर मशीन, बॅटरी, कॅमेरा, तीनचाकी गाडीचे खरेदी केलेले इंजिन, दोन आयरणी, एक ट्रॅक्टर बॅटरी व केबल व इतर वस्तू चोरीला गेले असल्याचे विजय पळसकर यांनी सांगितले असून या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.