टाकळी हाजी येथे शिवराय वेलनेस सेंटरचे उद्घाटन

0

टाकळी हाजी l आधुनिकतेची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करत असताना जीवनशैली सुधारण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू आहे,आणि या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी ‘ व्यायाम आणि आहार ‘ खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे सोमनाथ उचाळे यांच्या शिवराय वेलनेस या सेंटरचे उद्घाटन मंगळवारी (दि.२६) वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार किरण कानडे, अर्जुन सुसे आणि माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी गावडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगराई वाढल्याने रासायनिक खतांचा तसेच औषधांचा मारा मोठया प्रमाणात केला जातो,त्यामुळे सेंद्रिय तसेच पोषक आहार मिळत नाही.यामुळे मनुष्याचे आयुर्मान घटत चालले आहे.त्यामुळे योग्य आहार आणि व्यायाम याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, निवृत्त सीईओ प्रभाकर गावडे,शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे, टाकळी हाजीचे सरपंच अरुणाताई घोडे, निमगाव दूडे चे सरपंच शशिकला घोडे, माळवाडीचे सरपंच सोमनाथ भाकरे, रावडेवाडीचे सरपंच भाऊसाहेब किठे, सोसायटीचे अध्यक्ष बन्सीशेठ घोडे, शिवाजीराव घोडे,दौलत भाकरे, अर्जुन घोडे, अशोक गावडे ,वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार रवींद्र वेताळ, शिरीष साळवे,आरोग्य सल्लागार डॉ.मोहन पांढरे,विद्या चव्हाण, सुलोचना ताथवडे,अर्चना गायकवाड,सतीश चव्हाण, सोनाली दरेकर,योगिता पांढरे,शशिकला उचाळे आदी ग्रामस्थ व आरोग्य सल्लागार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ उचाळे, सूत्रसंचालन उत्कृष्ठ निवेदक लहू साबळे यांनी केले.

निरोगी आयुष्यासाठी व्यायाम आणि आहाराला महत्व द्या

आपला भारत देश लोकसंख्येच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर, आरोग्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर तर आनंदाच्या बाबतीत १२६ व्या क्रमांकावर आहे. आपल्या पंतप्रधानांनी गावोगावी वेलनेस सेंटर ची गरज असल्याने आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने दररोज किमान एक तास व्यायाम केला पाहिजे आणि सकस आहार घेतला पाहिजे.

अर्जुन सूसे , वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार

Leave A Reply

Your email address will not be published.