पिंपरखेड येथे जि. प. शाळेत आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा
पिंपरखेड l पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडेमळा येथे शनिवार ( दि.२३ ) रोजी आजी आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आजी आजोबा दिनाला सर्व मुलांचे आजी आजोबांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शाळेतील मुलांचे आजी आजोबा बरोबरचे नाते दृढ होऊन भविष्यातील पिढी संस्कारक्षम घडावी या हेतूने आजी आजोबा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांनी आपल्या आजी आजोबांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.
नंतर विद्यार्थ्यांनी आजोबांसाठी प्रार्थना, भजन, अभंग गायन केले यावेळी आजोबा आजीही त्यात सहभागी होवून तल्लीन झाले होते.आजोबा आजी साठी जेवणाचा बेत करण्यात आला होता.आजी आजोबा यांनी ही मुलांच्या खाऊ साठी पैसे दिले. आजी आजोबा दिनासाठी उपस्थित सर्व आजी आजोबांचे स्वागत मुख्याध्यापिका कल्पना निचित केले.तर आभार उपशिक्षक तानाजी पोखरकर यांनी मानले.