टाकळी हाजी गावात डीजेवर बंदी
टाकळी हाजी गावात डीजेवर बंदी
टाकळी हाजी
टाकळी हाजी तालुका शिरूर येथे ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या गुरुवार दिनांक वीस रोजी झालेल्या सभेत गावामध्ये डीजे वाजविण्यावर बंदीचा ठराव संमत करण्यात आला आहे . ग्रामपंचायत चे सदस्य व माजी सरपंच दामुशेठ घोडे आणि उपसरपंच गोविंद गावडे यांनी तसे पत्र पोलीस स्टेशनला दिले आहे.
गावची लोकसंख्या मोठी असल्यामुळे नियमित घरगुती व धार्मिक कार्यक्रम तसेच वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांमध्ये डीजे वाजविण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे लहान मुले तसेच वयोवृत्त व आजारी लोकांना याचा त्रास होत असतो. या डीजेच्या आवाजामुळे काहींना वेगवेगळ्या आजाराला सामोरे जावे लागले आहे.
चौदा ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत हा ठराव संमत करण्यात आला. याबाबतचे पत्र टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले यांना देण्यात आले. यावेळी माजी सरपंच दामुशेठ घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य भरत खामकर , दत्तात्रय सोदक, माळवाडी चे सरपंच सोमनाथ भाकरे उपस्थित होते.