पंचतळे चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी

; चुकीच्या पद्धतीने होतेय वाहनपार्किंग

0

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड

I वाहतुकीसाठी सुसाट बनलेल्या बेल्हे – जेजुरी राज्यामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर मागील दोन वर्षांत अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले असले तरी मात्र छोट्या मोठ्या अपघातांची मालिका मात्र अद्यापही सुरूच असून या राज्यमार्गावर मोठी वर्दळ असलेले पंचतळे आणि रोडेवाडी फाटा हे दोन प्रमुख चौक असून संबंधित चौकातून अनेक प्रवाशी, नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये- जा करत असतात. परंतु पंचतळे (ता.शिरूर) येथील चौकातून पाच रस्ते एकत्र येत असल्याने वाहनांची मोठी वर्दळ दिसून येते. मात्र काही वाहनचालक हे चुकीच्या पद्धतीने आपली वाहने रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने रस्त्यांवरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही परिणामी संबंधित चौकात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चौकात अनेक प्रवाशी जेवण, नाश्ता करण्यासाठी तसेच भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात परंतु चुकीच्या पद्धतीने अनेक वाहनचालकांनी आपली वाहने उभी करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे होणाऱ्या अपघातांच्या घटना टाळण्यासाठी आठवड्यातील काही दिवस शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत पंचतळे चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने होणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल . परिणामी अपघातांचे अनर्थ टळले जातील अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली

Leave A Reply

Your email address will not be published.