पी एम स्किल रन ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.
टाकळी हाजी l टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात १६ वर्षावरील ३४२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पी एम स्किल रनमध्ये सहभाग घेतला. शनिवारी (दि.१६) सकाळी साडेआठ वाजता टाकळी हाजी औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व माजी उपसरपंच अजित गावडे यांच्या शुभहस्ते स्पर्धेची सुरुवात झाली.
या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला गट असे दोन गट तयार करण्यात आले होते. अजितदादा गावडे युवा मंचच्या वतीने विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये पुरुष गटात अजित अनंत गुद्दे (प्रथम) , पवन गीताराम गावडे (व्दितीय), सचिन कैलास गावडे (तृतीय) व महिला गटात मुस्कान अंबीर मुजावर (प्रथम) , अंजली भालचंद्र काळे (द्वितीय) , तमन्ना पिरमोहम्मद हवालदार (तृतीय) विजयी झाले. त्याचप्रमाणे फ्रान्स मध्ये झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झालेली प्रियांका सोमनाथ साबळे हिस उत्तेजनार्थ पारितोषक देण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे, शिक्षक,कर्मचारी आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.