पारनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मुर्ती कार्यशाळा
पारनेर I पारनेर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयात शुक्रवारी (दि. १५ ) इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनवा कार्यशाळा संपन्न झाली.
कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांच्या संकल्पनेतून गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दिवसभरात विद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला. गणेशाची सोंड,हात , अवयव मातीच्या साह्याने कसे बनवावेत याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होती. त्या अनुषंगाने कवडे सर यांनी शाडूच्या माती पासून सोप्या पद्धतीने गणेश मूर्ती करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर गणरायाच्या मूर्ती तयार केल्या.
विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना वाव देण्यासाठी,त्यांना कलाकृती तयार करण्याचा आनंद मिळण्यासाठी व पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृत करण्यासाठी विद्यालयात शाडू मातीपासून पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनवा कार्यशाळा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुंदर मूर्तीचे प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले , उपप्राचार्य संजय कुसकर , समन्वयक अजित दिवटे , सतिष फापाळे, जयवंत पुजारी, कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे , कल्पना नरसाळे, सुरेखा थोरात , मनोहर रोकडे ,श्रीकांत शिंदे , संदीप पांढरे व सर्व शिक्षकवृंद व सेवक वृंद यांच्या उपस्थित करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांनी विद्यालयात राबविलेल्या या ‘पर्यावरण पूरक गणपती बनवा’ कार्यशाळेचे कौतूक करून विद्यार्थ्यांनी पुन्हा घरी असेच गणपती मूर्ती तयार करून त्याची घरात स्थापना करावी असे सांगितले . ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व कलाशिक्षक , शिक्षक व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले .