गहाळ २० मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द…
पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांची कौतुकास्पद कामगिरी
टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) l शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी शिरूर पोलीस स्टेशनला दाखल होत्या . त्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या तपासाची जबाबदारी पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर सोपविली होती. त्या अनुषंगाने त्यांनी तपास करत 20 मोबाईलचा शोध लावला.
शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी,पोलीस निरीक्षक संजय जगताप , सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव यांचे उपस्थितीत शोध घेतलेले सर्व मोबाईल सोमवारी (दि.२१) नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. गहाळ झालेले मोबाईल शोधून काढले याबद्दल पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.