म्हसे येथे महिलेवर बिबटयाचा हल्ला

महिला बाल बाल बचावली

0

 

टाकळी हाजी :  म्हसे (ता. शिरूर) येथील ६५ वर्षीय महीलेवर शनिवारी (दि.१९) बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. लघू शंकेसाठी सांयकाळी ७ च्या सुमाराम घराबाहेर आलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने बाजरीच्या शेतातून येत पाठीमागून हल्ला केला. या हल्ल्यात महिलेच्या पाठीवर, डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहे. सदर महिलेला तात्काळ शिरूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.


बेट भागातील जांबुत, पिंपरखेड या भागात बिबटयाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यात पुन्हा म्हसे येथे बिबट्याने हल्ला केल्याने नागरीक भितीच्या छायेखाली जीवन जगत आहे. हल्ला झाल्यावरच पिंजरा लावला जात आहे. वनविभाग हलगर्जीपणा करत असून परीसरात जनजागृती करत नाही असा तक्रारीचा सुर नागरीकांमधून उमटत आहे.

गेली दोन वर्षापासून या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. अनेकदा पशुधनासह चार जणांना आपला जीव गमवावा लागला असुन बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे शेतमजुरांसह नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून याबाबत पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी म्हसे गावचे सामाजिक कार्यकर्ते काळुराम पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.